शुभरत्न हे श्रद्धेने व शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेले पूजन वस्तू असल्याने, चांगल्या स्थितीत मिळालेली वस्तू परत घेतली जात नाही व त्यासाठी रिफंड दिला जात नाही. खालील प्रसंगी मात्र रक्कम परत केली जाते किंवा वस्तू बदलून दिली जाते.
रद्दीकरण: ऑर्डर पाठवण्यापूर्वी (डिस्पॅच होण्याआधी) तुम्ही +91 96 57 130 131 या क्रमांकावर फोन / WhatsApp करून ऑर्डर रद्द करू शकता. पेमेंट आधीच केले असल्यास पूर्ण रक्कम (डिलिव्हरी शुल्कासह) परत केली जाते. एकदा वस्तू पाठवल्यानंतर रद्दीकरण शक्य नाही.
खराब, तुटलेली किंवा चुकीची वस्तू: पॅकेज उघडताना वस्तू तुटलेली, खराब किंवा चुकीची आढळल्यास, पॅकेज मिळाल्यापासून २४ तासांच्या आत आम्हाला फोन व अनबॉक्सिंग व्हिडिओसह कळवा. योग्य प्रकरणात आम्ही वस्तू बदलून देऊ, किंवा बदलणे शक्य नसल्यास रक्कम परत करू.
पेमेंट होऊन ऑर्डर न बनल्यास / दुहेरी पेमेंट: तुमच्या खात्यातून पैसे कट झाले पण ऑर्डर नोंदवली गेली नाही, किंवा एकाच ऑर्डरसाठी दोनदा पेमेंट झाले, तर ऑर्डर क्रमांक / UTR सह आम्हाला कळवा. पडताळणीनंतर अतिरिक्त रक्कम परत केली जाते.
रिफंड कसा व कधी मिळतो: मंजूर झालेला रिफंड तुम्ही ज्या खात्यातून / UPI ID वरून पेमेंट केले त्याच खात्यात परत केला जातो. साधारण ५–७ कामकाजाच्या दिवसांत रक्कम जमा होते (बँकेच्या प्रक्रियेनुसार थोडा फरक पडू शकतो). COD ऑर्डर पाठवण्यापूर्वी रद्द केल्यास कोणतीही रक्कम आकारली जात नाही.
ऑर्डर करण्यापूर्वी आम्ही फोनवर तुमच्या सर्व शंकांचे समाधान करतो — त्यामुळे निर्णय समजून-उमजून घ्या.